ऋषभ पंतच्या वाढदिवशी युवराज सिंगची शुभेच्छाची पोस्ट व्हायरल!


भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत  आज २३ वा वाढदिवस आहे. तरुण वयातचं पंतने आपल्या उत्कृष्ट खेळामुळे दिग्गज खेळाडूंना आकर्षित केलं आहे. टीम इंडियामध्ये महेंद्रसिंग धोनी  चा उत्तराधिकारी म्हणून पंतला ओळखलं जातं. पंत यांच्या वाढदिवसानिमित्त टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग ने जबरदस्त शुभेच्छा दिल्या आहेत. युवराज अनेकदा आपल्याबरोबर खेळलेल्या खेळाडूंची मजा घेतो. युवराजने केलेली वाढदिवसाची पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
 

युवराजने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पंतबरोबर दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने असे लिहिले आहे की, 'ज्याचं नाव आहे पंत आणि वागणं निक्कर सारखं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुरक्षित रहा आणि आयपीएलच्या यशासाठी शुभेच्छा. '

Post a Comment

0 Comments