विजेच्या धक्काने निधन झालेल्या पोलीस रामेश्वर मोहिते कुटुंबियांना सहकारी पोलीस मित्राकडून दोन लाखांची आर्थिक मदतबार्शी/प्रतिनिधी : बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्सटेबल रामेश्वर मोहिते यांचे काही दिवसापूर्वी विजेच्या धक्याने दु:खद निधन झाले होते. ते चिखली ता.जि. उस्माबाद येथील रहिवाशी होते. ते बार्शी तालुका पोलिस ठाणे येथे कार्यरत होते.
________________________________________
📢
(Advertise)
__________________________________________

रामेश्वर मोहिते हे त्यांच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने प्रचलित होते. त्यांचेच सोबत काम करणारे बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस आणि सहाय्यक पोलीस अधिकारी यांनी मिळुन मोहिते यांचे कुटूंबाला दोन लाख रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक मदत केली आहे. 

यावेळी ही मदत नव्हे तर आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतोय असे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव जायपत्रे यांनी सांगितले. सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि बार्शी विभागाचे उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांनी बार्शी तालुका पोलिसांचे कार्याबद्दल कौतुक केले.

Post a Comment

0 Comments