उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सोयाबीन मळणी यंत्रात अडकून शेतमजूर महिलेचे शीर धडा वेगळे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी गावाच्या शिवारात ही घटना घडली आहे. निलावती भगवान मारकड असं मृत महिलेचे नाव आहे. निलावती मारकड या रोजनदारीवर सोयाबीन मळणीचे काम करत होत्या, काम करत असताना अचानक मळणी यंत्रात निलावती या अडकल्या. त्यामुळे काही कळायच्या आत निलावती यांचे शीर धडा वेगळे झाले. यात निलावती यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
शेतमजूर आणि निलावती यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि निलावती यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
0 Comments