कंगनाच्या ‘या’ विधानाने खळबळ; महात्मा गांधी अन् नेहरूंवर साधला निशाणाअभिनेत्री कंगना राणावत ही गेल्या काही दिवसांपासून सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. कोणत्या ना कोणत्या विधानाने कंगनाच्या अडचणी सतत वाढत आहे. पुन्हा एकदा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी कंगनाने केलेल्या विधानाने ती वादात सापडली आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कंगनाने ट्वीट करून त्यांना अभिवादन केले. परंतु, कंगनाचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याचे कारण असे की, तिने सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्वीटमध्ये महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्यावर टीका केली आहे.

कंगणा ट्वीटमध्ये म्हणतीये, सरदार वल्लभभाई पटेल यांनी जयंती निमित्ताने शुभेच्छा, भारताचे लोहपुरुष सरदार पटेल तुम्ही अशी व्यक्ती होतात, ज्यांनी आम्हाला आजचा अखंड भारत दिला. महात्मा गांधी यांनी खूश करण्यासाठी आपण पंतप्रधान पदाचा त्याग केला.

Post a Comment

0 Comments