पंढरपूर/प्रतिनिधी:
उजनी धरणातून सोडलेले पाणी पंढरपूर मध्ये पोहोचले, त्यामुळे चंद्रभागेला पूर आला आहे. पुराचे पाणी विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर आले असून या परिसरातील नागरिकांना करण्यासाठी वापर करावा लागत आहे. भीमा नदी २ लाख ८७ क्यूसेक ने सध्या वाहत आहे. तरी पाऊसामूळे मिसळणाऱ्या पाण्यामुळे साडेतीन लाखांच्या आसपास पाणी पातळी आहे.
पंढरपूर येथे येणार सर्व मार्ग बंद करण्यात आले आहे. शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, लखुमाई मंदिर, गोविंदपुरा, आंबेडकर नगर, दत्तनगर आधी परिसरामध्ये ६ फुटा पर्यंत पाणी आले आहे. त्यामुळे पंढरपुर शहराची परस्थिती भयानक झाली आहे. अर्ध पंढरपूर पाण्याखाली आले आहे.
उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, याचा परिणाम पंढरपूर शहर आणि नदीकाठच्या गावांवर झाला आहे़ अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती ओढावली आहे. शहरातील नदीकाठच्या जवळपास ८ हजार कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे़ ग्रामीण भागात देखील नागरिकांना स्थलांतरीत केले आहे.
पंढरपूरकडे येणारे सातारा, पुणे सोलापूर, मंगळवेढा या ठिकाणची वाहतूक बंद केली तर काही ठिकाणी वळविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.
0 Comments