आमदार राजेंद्र राऊत व प्रांताधिकारी हेमंत निकम यांचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश व सुचना


बार्शी/प्रतिनिधी:

 बुधवार दि १४ ऑक्टोबर रोजी बार्शी शहर व तालुक्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शहरातील बहुतांश भागात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून जीवनावश्यक वस्तू व संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठेत अनेकांच्या दुकानात पाणी शिरून दुकानातील साहित्यांचे नुकसान झालेले आहे.
  
तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील भोगावती, नागझरी नदीला पूर आल्यामुळे, त्याचप्रमाणे अनेक भागात तळे व बंधारे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून खेड्यातील अनेक घरांचीही पडझड झालेली आहे.
  
या सर्व बाबींचा विचार करता आमदार राजेंद्र राऊत व प्रांताधिकारी हेमंत निकम साहेब यांनी गुरुवार दिनांक 15 ऑक्‍टोबर रोजी बार्शी तहसील कार्यालय येथे संबंधितांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, नगर परिषदेचे संबंधित अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, जलसंधारण विभागाचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संबंधित अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदींची तात्काळ बैठक घेऊन शहर व तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश व सूचना आमदार राजेंद्र राऊत व प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिल्या.
  
याचबरोबर शहर व तालुक्यातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी भयभीत न होता येणाऱ्या संकटाचा सामना धीराने करावा व कोणतीही मदत लागल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले.

Post a Comment

0 Comments