जेऊर/प्रतिनिधी:
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे काम शासनाचे आहे शेतकऱ्याचा संसार उघड्यावर आला आहे, सरकारने पंचनामे करण्याचा फार्स बंद करून तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करावेत उगाच वेळकाढू पणा करू नये प्रती हेक्टरी कमीत कमी २५ हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब झोळ यांनी केली आहे.
त्यामुळे शेती कामे करण्यासाठी पैसे उपलब्ध होतील. शेतकरी रब्बी पिकांची पेरणी करतील तातडीने अनुदान वर्ग केले नाहीतर स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठे जनआंदोलन उभा करेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब झोल यांनी दिला आहे.
0 Comments