मुख्यमंत्री, तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी - कंगना राणावत


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्या निमित्त आपल्या ठाकरे शैलीत रोखटोख भाषण करत भाजप, नरेंद्र मोदी, कंगणा राणावत यांना टिकेच लक्ष्य करत जोरदार प्रहार केला. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणणारा रावण आला आहे, असे उद्धव ठाकरे कंगनाला उद्देशून म्हणाले होते. उद्धव ठाकरेंच्या याच टीकेचा अभिनेत्री कंगना राणावतने समाचार घेतला आहे.

‘मुख्यमंत्री, तुम्हाला तुमची लाज वाटायला हवी. लोकसेवक असताना तुम्ही क्षुल्लक गोष्टींवरून संघर्ष करत आहात. तुमच्याकडे असणारी सत्ता तुमच्याशी सहमत नसलेल्या इतरांचा अपमान करण्यासाठी, त्यांना हानी पोहोचवण्यासाठी वापरत आहात. घाणेरडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी,’ अशा शब्दांत कंगनानं मुख्यमंत्री ठाकरेंवर पलटवार केला आहे.

Post a Comment

0 Comments