" जयसिंगपूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक पदाची सोनेरी माळ ' गुंडाप्पा पवार ' यांच्या गळ्यात"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी

 जयसिंगपूर नगरपरिषदेच्या एक रिक्त असलेल्या जागेवर स्वीकृत नगरसेवक पदी गुंडाप्पा पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.याअगोदर स्वीकृत नगरसेवकपदी उदयसिंह खाडे हे  कार्यरत होते मात्र २ एप्रिल २०२० रोजी त्यांच्या अकाली निधनामुळे हे पद रिक्त झाले होते. परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीमुळे सर्व परिस्थिती जैसे थे होती. त्याच दरम्यान जयसिंगपूरातील इच्छुकांनी पूर्ण ताकदीनिशी नगरसेवक पद हे आपल्याच पदरात पडावे यासाठी विविध मार्गांचा वापर करण्यात आला त्यासाठी काहींनी कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या माध्यमातून लॉबिग करण्याचा प्रयत्न केला. जयसिंगपूर वासियांच्या मनात स्वीकृत नगरसेवकाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याविषयी प्रचंड मोठी उत्सुकता होती.अखेरीस गुंडाप्पा पवार यांची स्वीकृत नगरसेवक पदी वर्णी लागली.
   
श्री.गुंडाप्पा पवार हे 'आम्ही यड्रावकर' या गटाचे कट्टर समर्थक , तरुण साथीदार मित्रांची प्रचंड मोठी फौज, त्यांनी दिलेले सामाजिक व राजकीय योगदान  व यड्रावकर गटासाठीचे केलेलं काम याचा सारासार विचार करून  ,संजय पाटील-यड्रावकर,उपनगराध्यक्ष व त्यांच्या टीमने उत्तम राजकीय हातोटीच्या माध्यमातून  गुंडाप्पा पवार यांना टाळी दिली. आज जयसिंगपूर नगरपरिषदेची नगरसेवक पदाची ऑनलाईन बैठक संपन्न झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ.सौ.नीता माने, (नगराध्यक्ष,जयसिंगपूर नगरपरिषद)या होत्या. या ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून दोन्ही आघाडीच्या सुसंगत निर्णयानुसार सर्वानुमते श्री.गुंडाप्पा साताप्पा पवार यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. यानंतर लगेच पवार यांच्या समर्थकांनी जयसिंगपूर शहर व  शाहूनगरमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजी करून मोठा आनंदोत्सव साजरा केला.

Post a Comment

0 Comments