राज की बात! अखेर हार्दिकच्या हटके हेअरस्टाईलचं गुपित उघड
दुबईमध्ये क्रिकेटचा महाकुंभ भरला आहे. अर्थात अगदी अनोख्या अंदाजात खऱ्या अर्थानं परदेशी भूमीवर आयपीएलचा रणसंग्राम रंगत आहे. IPL 2020 च्या यंदाच्या हंगामात काही नव्या खेळाडूंनी क्रीडारसिकांची मनं जिंकली आहेत. तर, काही खेळाडूंनी अपेक्षापूर्ती करत साजेसा खेळ केला आहे. यातीलच एक नाव म्हणजे हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या. 

भावा- भावांची ही जोडी मैदानावर आली, की पुढची काही मिनिटं अफलातून खेळ पाहायला मिळणार हे नाकारता येत नाही. अशी ही जोडी सध्या अशी काही गुपितं सर्वांपुढे आणताना दिसत आहे, ज्याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. 

हार्दिक पांड्या हा जितका त्याच्या खेळासाठी ओळखला जातो, तितकाच त्याच्या स्टाईल स्टेटमेंटसाठीही ओळखला जातो. त्याच्या याच स्टाईल स्टेटमेंटला अनुसरुन एका क्रिकेट चाहतीनं त्याला त्याच्या हेअरस्टाईलबद्दल एक प्रश्न विचारला. लॉकडाऊनच्या काळात तुझे केस कोण कापत होतं, असं विचारत तिनं हार्दिकलाच पेचात पाडलं. 

तिच्या या प्रश्नावर उत्तर देत कृणालनं हार्दिकचे केस कापल्याची बाब सर्वांसमोर आली. ही सर्वात सोपी हेअरस्टाईल आहे, त्यात किचकट असं काहीच नाही असं म्हणत आपल्या या झिरो कटबाबत हार्दिक सांगत होता. दोन भाऊ असण्याचा हा फायदा आहे, असं म्हणत हार्दिक यावर विनोद करताना दिसला. 

सध्याचा हार्दिकचा लूक पाहिला तर, त्यानंच या हेअरस्टाईलची सुरुवात केली, पण आपल्याला हे जमत नसल्याचं लक्षात येताच तो कृणालकडे गेला आणि त्यानं बाजूने केस नीट कापून घेतले. अशा पद्धतीनं हार्दिकची ही हेअरस्टाईल चर्चेचा विषय ठरली. 


 

Post a Comment

0 Comments