मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविषयी अर्वाच्च भाषा वापरल्या प्रकरणी नारायण राणे यांच्यावर बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



बार्शी/प्रतिनिधी:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अर्वाच्च भाषा वापरल्या प्रकरणी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी याबाबत तक्रार दिली आहे. 

  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात नारायण राणे व त्यांचे पुत्र माजी खासदार नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्यावर टीका केल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणाला उत्तर देताना भाजपचे नारायण राणे यांनी अर्वाच्य भाषा वापरली. यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण झाला.

बार्शीचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर राणे यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल न केल्यास राणे यांच्या पुतळ्याचे दहन करू असा इशारा देत पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांना आंधळकर यांनी निवेदन दिले होते.

यावेळी शिवसेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष सुनीता जाधव, मनीष चव्हाण, बापू काळे, अन्वर मुजावर, इरफान बागवान, सचिन ढावारे, जावेद पठाण, कालू शेख, शकील शेख, सगीर सय्यद आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments