एकनाथ खडसेंना कोणतं मंत्रिपद द्यायचं याचा निर्णय शरद पवारच घेतील, असं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत येत आहेत. त्यांचं स्वागतच आहे. आम्ही सर्व त्यांचं आनंदानं स्वागत करणार आहोत, असं छगन भुजबळ म्हणालेत. खडसे च्या अनुभवाचा आमच्या पक्षाला नक्कीच फायदा होईल.
खडसेंना कोणतं मंत्रिपद देण्यात येणार आहे? त्यांच्यासाठी कोणत्या मंत्र्याचा राजीनामा घेण्यात येणार आहे?, असा सवाल भुजबळ यांना करण्यात आला. त्यावर खडसेंना कोणतं मंत्रिपद द्यायचं याबाबत पवारच निर्णय घेतील, असं भुजबळ म्हणाले.
0 Comments