लठ्ठे एज्युकेशन सोसायटी शिक्षणसंस्था सांगली,
राज्यशास्त्र आधिविभाग
महाराष्ट्राचे राजकारण असो किंवा भारतातील राजकारण असो किंवा जगातील राजकारण असो पण राजकर्त्यांना राजकारण करत असताना काही लोक शंभर टक्के वाईटच म्हणतात. पण राजकारणात वावरत असताना किंवा समाजसेवा करत असताना राजकारणातला सुद्धा संत होता येत हे घडवून दाखवणारे आत्मसात करणारे व समाजाला देशाला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात निर्माण झालं त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत एक अभ्यासू ज्येष्ठ नेते म्हणून सदैव उल्लेख होतो ते म्हणजे सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई गणपतराव देशमुख साहेब यांचा उल्लेख राजकारणातील संत म्हणून घेतला जातो, आणि आयुष्यभर घेतला जाईल कारण राजकारणामध्ये आपलं व्यक्तिमत्व निर्माण करत असताना विचारपूर्वक निर्णय घेत असताना अशा अनेक विषयांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघांमध्ये साठ वर्ष त्यांनी मतदारसंघातील जनतेची सेवा करत विधानसभेमध्ये सेवा केली. अशा आमदाराला मी खरंच महाराष्ट्रातील जनतेचा आणि भारतातील जनतेचा जगातील जनतेचा खरा हिरो असे म्हणतो कारण एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवून आणि पुढच्या जनतेच्या मनातील प्रेम भावना प्रामाणिकपणा माया अशा अनेक गोष्टीत जोपासलेल्या व्यक्तिमत्व म्हणून भाई गणपतराव देशमुख साहेबांना मानलं जातं.
ग्रामीण भागातून ते महाराष्ट्राच्या विधान भवनापर्यंत आणि देशाच्या संसदेपर्यंत व गिनीज वर्ल्ड बुक पर्यंत यांच्या नावाची चर्चा अभ्यासू शेतकऱ्यांचे नेते उच्चशिक्षित साधी राहणीमान उच्च विचारसरणी अशा व्यक्तिमत्त्वाचा आदर संपूर्ण जगाने केला ते म्हणजे भाई गणपतराव देशमुख राजकारणामध्ये राहत असताना अनेक पक्षांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध अनेक पक्षातील नेते भाई गणपतराव देशमुख साहेबांना आदरयुक्त सन्मान देत असतात म्हणून अशा व्यक्तिमत्वाला मी सलाम करत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना भाई गणपतराव देशमुख साहेब आमदार झाले मंत्री झाले पण माणूस म्हणून ही गोष्ट आयुष्यभर समाजाला शेतकऱ्याला जोडली गेलेली जोपासण्याचे काम भाई गणपतराव देशमुख साहेबांनी प्रामाणिक पणे केले, यात शंका उरत नाही.
विधानसभेचा खूप मोठा अनुभव असणारा नेता म्हणून मला भाई गणपतराव देशमुख साहेब आत्ता सध्या दिसत आहेत. भाई गणपतराव देशमुख साहेब पहिल्या वेळेस आमदार झाले त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांनी तरुणव्यक्तिमत्व तडफदार शेतकऱ्यांचे नेते म्हणून सभागृहांमध्ये भाई गणपतराव देशमुख यांना बोलण्याची संधी यशवंतराव चव्हाणसाहेब देत असत आणि भाई गणपतराव देशमुख या तरुणांचे भाषण यशवंतराव चव्हाण साहेब ऐकत असत पाठीवरुन हात फिरवत असत त्याच प्रमाणे यशवंतराव चव्हाण साहेब सभागृह मध्ये बोलत असताना त्यांचे भाषण भाई गणपतराव देशमुख साहेब खूप विचारपूर्वक ऐकत असत कारण यांच्या सानिध्यात आपण वाढत असतो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या अभ्यासाचा प्रत्येक पैलू आपल्या विचारात निर्माण होत असतो.
म्हणूनच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगाच्या पाठीवर सर्वात जास्त आमदार होण्याचं रेकॉर्ड हे गणपतराव देशमुख साहेबांनी निर्माण केलं, त्यांच्या पाठीमागे अनेक लोकांचा पाठिंबा शेतकऱ्यांचा पाठिंबा ह्या सर्वांच्या विचारातून हे व्यक्तिमत्व घडलेलं मला दिसत आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वावरत असताना महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास करत असताना यशवंतराव चव्हाण, भाई गणपतराव देशमुख , वसंतराव नाईक, अंतुले साहेब, वसंत दादा पाटील, शरदचंद्रजी पवार, विलासरावजी देशमुख, गोपीनाथरावजी मुंडे असे अनेक नेते या महाराष्ट्राच्या मातीला व महाराष्ट्राला उभारी देण्यासाठी लाभले. म्हणून खरंच मला हा सर्वांचा आदर वाटतो भाई गणपतराव देशमुख साहेबानी समाज परिवर्तनासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि त्याचबरोबर प्रत्येक उद्योगधंद्यासाठी प्रत्येक विषयाच्या माध्यमातून विकासाला गती देण्याचे काम भाई गणपतराव देशमुख साहेबांनी केलेले आपणास दिसून येते बारा वेळेस म्हणजेच साठ वर्ष आमदार राहूनही खूप साधे जीवन जगणारे गणपतराव देशमुख साहेब हे जगातील एकमेव नेते असतील असं मला वाटतं कारण ९१ व्या वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उभारून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या व्यक्तिमत्व म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहेत खरंच जे व्यक्तिमत्व समाजासाठी शेतकऱ्यांसाठी गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र काम करत असतात अशा व्यक्तिमत्वाला वयाचं कधीच बंधन नसतं, हे गणपतराव देशमुख साहेबांनी आपल्याला दाखवून दिले आहे कारण ९१ वय झालं असलं तरीसुद्धा विधानसभेमध्ये सात्यत्याने जाणं सोलापूरच्या विकास कामासाठी सातत्याने प्रयत्न करणे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये अभ्यास पूर्ण माहिती सातत्याने अकलन करणे, गणपतराव देशमुख साहेब नवीन नवीन गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न आदरणीय भाई गणपतराव देशमुख साहेब करत होते. आणि करत आहेत म्हणून काही वर्षाच्या पाठीमागे त्यांना एखादे लेखकाने दिलेली उपमा महाराष्ट्रातील संत म्हणून तो लेख मी वाचला होता पण खरंच भाई गणपतराव देशमुख खरंच हे महाराष्ट्रातील संत आहेत आणि ते सुद्धा राजकारणामधील असाच प्रसंग दिसून आला लहान मुलापासून तरुणांपर्यंत तरुणांपासून बुजुर्ग थोर व्यक्तीपर्यंत सर्वांना माणुसकीच्या नात्यानं बोलणारे भाई गणपतराव देशमुख साहेबांचं कर्तव्य मी जवळून पाहिलं आहे, खरंच अशा व्यक्तिमत्त्वाला भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा हीच आशा मी करत आहे.
भाई गणपतराव देशमुख याचं कार्य सखोल पारदर्शी प्रामाणिक विश्वासू जिद्दी अशा अनेक विषयाच्या भोवती सातत्याने ओलावा निर्माण करणारे व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या मातीने घडवलं आहे, आणि त्याची व्यक्तिमत्त्वानं महाराष्ट्राच्या मातीसाठी आपलं जीवन सदैव समाजासाठी आणि शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे कर्तव्यदक्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून मला भाई गणपतराव देशमुख म्हणजेच आबांचा आदर वाटतो, म्हणून पुन्हा एकदा भाई गणपतराव देशमुख येणारी काळ सुख-समाधानाचे भरभराटीचे आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आणि त्यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा हीच इच्छा पुन्हा एकदा मी करत आहे.
0 Comments