माळशिरस येथे दुर्मिळ मांडुळ जातीचे तस्करी करणारे तीन जण पोलीसांच्या ताब्यात


माळशिरस/प्रतिनिधी:

अवैधरीत्या दुर्मिळ मांडूळ जातीच्या जिवंत सापाची ४० लाख रुपयांना विक्री करण्याच्या तयारीत असणाऱ्या तिघा जणांना तर वृद्ध दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवून लुटणारी टोळी तसेच विविध ठिकाणी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी करणारी अट्टल टोळी माळशिरस पोलिसांनी जेरबंद केली आहे.

  सदाशिवनगर येथील पालखी मैदानावर शुक्रवारी (ता. ०९) दुपारी तीन वाजता माळशिरस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके हे पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारांकडून पालखी मैदानावर तीनजण मांडूळ जातीच्या जिवंत सापाची ४० लाख रुपयांना विक्री करण्यासाठी येत असल्याबाबत माहिती मिळाली.

मिळालेल्या खबरीनुसार पोलिस पालखी मैदानाकडे रवाना झाले. तेथे संतोष दत्तात्रेय टेळे (वय २४), पोपट रामा टेळे (वय ४५, दोघे रा.मांडवे), प्रवीण तानाजी दडस (वय २६, रा. तामशिदवाडी) यांची चौकशी केली. त्यांच्याकडील गुलाबी रंगाच्या प्लास्टिकच्या किटलीत जिवंत साप आढळून आले. यातील एजंट तुषार लवटे हा पोलिसांना मिळून आला आहे. वरील मुद्देमाल वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे.

तर चोरी प्रकरणात माळशिरस तालुक्‍यातील जाधववाडी येथील घनश्‍याम रामचंद्र जाधव (वय ७९) यांच्या घरी १५ सप्टेंबर २०२० रोजी मध्यरात्रीनंतर घरफोडी झाली होती. तपास करीत असता सूरज दुर्योधन काळे (वय २७, रा. माळशिरस), सूरज कुंडलिक जाधव (वय २०, रा. जाधववाडी) यांनी वरील चोऱ्या केल्या आहेत.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक विश्वंभर गोल्डे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके, सचिन हेंबाडे, समाधान शेंडगे, सोमनाथ माने, दत्तात्रय खरात व अमोल बकाल यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments