कर्नाटक राज्यातून मंगळवेढा हद्दीत येणारा गुटख्यावर कारवाई, ८ लाखाचा मुद्देमाल जप्त



मंगळवेढा/प्रतिनिधी:

कर्नाटक राज्यातून मंगळवेढा हद्दीत येणारा गुटख्याचा टेंपो पोलिसांनी पकडून टेंपोसह ७ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कर्नाटक राज्यातून एम एच ४२, एक्यू ५५६९ या टेंपोमधून १३ हजार ५५२ रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू गुटखा, ४९ हजार ९२० रुपये किमतीचा विमल पान मसाला, १३७२८ रुपये किमतीची सुगंधी तंबाखू, ५७ हजार ६०० रुपये किमतीचा आरएमडी पान मसाला, २४ हजार रुपये किमतीची एम सुगंधी तंबाखू, १ लाख २१ हजार ९६८ रुपये किमतीचा विमल पान मसाला मोठा असा एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
गुटख्याचा टेंपो पोलिसांनी पकडून टेंपोसह ७ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सुनिल भारत वायभसे (वय ३० रा. दापोली), निलेशकुमार बन्सीलाल बाहोती (वय ३० रा. नागरगाव ता. शिरूर, पुणे) या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२२ रोजी रात्री ८.३० च्या दरम्यान कर्नाटक राज्यातून गुटखा भरून त्याची अवैधरित्या वाहतूक वरील आरोपी सोडडी गावच्या शिवारातून करीत असताना पोलिसांना मिळून आले.याची फिर्याद पोलिस शिपाई अभिजीत साळुंखे यांनी दिली आहे.

मंगळवेढयापासून केवळ २० कि.मी.अंतरावर कर्नाटकची सीमा आहे. कर्नाटक राज्यात गुटखा खुला असल्याने येथील व्यापारी तेथे जावून खरेदी करून चोरटया मार्गाने मंगळवेढयात प्रवेश करीत आहेत. ही सर्व तस्करी रोखण्यासाठी मंगळवेढा सीमेवर चेक आऊटपोस्ट गरजेचे आहे.नूतन पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी या कामी लक्ष घालून सीमेवर चोख बंदोबस्त नेमावा अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments