चंदुरच्या शरद पाटीलचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान!कोल्हापूर : फोटोग्राफी ॲण्ड आर्टिस्टस सोशल फाऊंडेशन या संस्थेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रण स्पर्धेतील विजेत्या छायाचित्रकारांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यामध्ये चंदूर येथील शरद इरगोंडा पाटील यांच्याही छायाचित्रास पारितोषिक मिळाले.शरदने महाराष्ट्रातील वारी, व ग्रामीण जीवन कॅमेरा बद्द्ल केलेल्या निवडक  छायाचित्रांचे फोटोबुक राज्यपाल महोदयांना भेट दिले.याचेही विशेष कौतुक त्यांनी केले.हा कार्यक्रम राजभवन येथे संपन्न झाला. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष समाधान पारकर, विश्वस्त दीपक खाडे, संदीप आजगावकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments