अखिल भारतीय नाथ संघटनेची कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी जाहीर

 प्रा.डॉ. प्रभाकर माने/ जयसिंगपूर

 आज कोल्हापूर जिल्ह्यातील नाथ बांधवांची कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हा,तालुका,शहर व ग्रामीण या पातळीवर कार्य करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांची पदे जाहीर करून सर्वानुमते सांगोपांग चर्चा करून कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी स्थापन करण्यात आली.    याप्रसंगी  नाथ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.बाबानाथ जाधव,  मा.श्री.संजय बामणे आणि मा.श्री. सज्जन पवार यांच्या मार्गर्शनाखाली आजची बैठक पार पाडली.

       आजच्या बैठकीत पदांच्या निवडीबरोबर संघटनात्मक  एकी,महिलांना रोजगार निर्मिती,शासकीय योजना व त्याचबरोबर नाथ समाजावर वारंवार अन्याय व अत्याचार होत आहेत त्याविरुद्ध आवाज उठवून शासन दरबारी आपला आवाज पोहचवण्यासाठी संघटना स्थापन करण्यात आली आहे.संघटनेची  प्रचार, प्रसार आणि संघटनेचे बळ वाढवून अन्यायाला विरोध करून नाथ बांधवांच्यावर होणारे अत्याचार दूर करून त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल यावर विचारविनिमय करून ठोस भूमिका घेण्यात आली.

         आजच्या बैठकीत कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.संतोष बामणे,नाथ युवा सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रोहित जाधव,कोल्हापूर शहर अध्यक्ष मा.श्री.प्रवीण चौगुले,कोल्हापूर जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षा श्रीमती.भाग्य लता जाधव मॅडम,कोल्हापूर जिल्हा तालुका अध्यक्ष पंढरीनाथ हिंगमिरे,हातकणंगले तालुका महिला अध्यक्षा श्रीमती.कविता डवरी,हातकणंगले तालुका युवा सेना अध्यक्ष सुशांत जाधव त्याच बरोबर नाथ बांधव आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments