करमाळा! लॉकडाऊन मध्ये मोफत धान्य वाटप केले त्यांचे कमिशन स्वस्त धान्य दुकानदाराला ताबडतोब मिळावे - सतीश नील-पाटील


करमाळा तालुक्यातील प्रधान मंत्री गोरगरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य वाटप केले आहे त्याचे स्वस्त धान्य दुकानदार यांना कमीशन वाटप करण्यात यावे, अशी मागणी सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक श्री सतीश नीळ पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. पुढे श्री नीळ पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, प्रधान मंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य वाटप केले आहे त्याचे कमीशन स्वस्त धान्य दुकानदार यांना अद्यापही दिले नाही.

लॉक डाऊन काळात प्रधान मंत्री गरीब कुटंब कल्याण योजने अंतर्गत प्रती महिना माणशी ५ किलो धान्य मोफत वाटप करण्यात आले आहे. करमाळा तालुक्यातील जवळपास  ७००० क्विंटल प्रति महिना धान्य वाटप केले आहे. त्याचे कमीशन अद्यापही दिले नाही. तसेच आपल्या शेजारील उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच दुकानदार यांना कमीशन मिळालेले आहे. मग करमाळा तालुक्यातील दुकानदार यांना का मिळाले नाही याची चौकशी करून तात्काळ सर्वच स्वस्त धान्य दुकानदार यांना तात्काळ कमीशन वाटप करण्यात यावे हि विनंती.
  
तसेच कोरोना महामारी काळात स्वस्त धान्य दुकानदार यांनी आपापल्या परीने प्रयत्न करत अत्यंत भयानक परिस्थिती असतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालून शासकीय योजना प्रभावी पणे राबविली आहे. या काळात अत्यंत काळजी पूर्वक गोरगरीब जनतेसाठी योगदान दिले आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदार यांचे थकीत कमीशन तात्काळ वाटप करण्यात यावे.व तसे आदेश सर्व सबंधित अधिकारी यांना द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती आमदार संजय मामा शिंदे, जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा पुरवठा अधिकारी , सोलापूर, तहसीलदार करमाळा यांना दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments