चाळीस वर्षे नगराध्यक्षपदी राहणारे सातलिंगप्पा म्हेत्रे देशात एकमेव : सुशीलकुमार शिंदेसोलापूर : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्‍याचे नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाची हानी झाली आहे. 

सातलिंगप्पा म्हेत्रे हे कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते तर होतेच पण कॉंग्रेसचे अभेद्य भिंत होते. ते चाळीस वर्षे दुधनी शहराचे नगराध्यक्ष होते, हे देशातील एकमेव उदाहरण होय, असे मत सुशीलकुमार शिंदे यांनी कॉंग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या शोकसभेत व्यक्त केले. 

यावेळी नालिनीताई चंदेले, अक्कलकोट महिला अध्यक्ष मंगला पाटील, सांगोला तालुका अध्यक्ष राजकुमार पवार, माढा चे अध्यक्ष सौदागर जाधव, अनुसूचित जाती जिल्हा अध्यक्ष गौरव खरात, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष वसिमभाई पठाण, दिलीप जाधव, हणमंत मोरे, उमेश सुरते, अंबादास गुत्तिकोंडा, शौकत पठाण, सिद्धाराम चाकोते, तिरुपती परकीपंडला, उमाशंकर रावत, राजू जाधव, प्रा सिद्राम सलवदे, मल्लीनाथ सोलापूरे, अनुपम शहा, श्वेता हुल्लेनवरु, प्रियंका डोंगरे, आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments