हाथरस प्रकरणातील आरोपी निष्पाप; भाजप नेत्याची मुक्ताफळे



उत्तरप्रदेशमधील हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशात गोंधळात माजला. यातच भाजप नेत्याने या प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले आहे. हाथरस प्रकरणातील मुले निर्दोष आहेत. त्यांना वेळेत सोडले गेले नाही, तर मानसिक त्रासाला सामोर जावे लागेल. त्याचे गेलेले वय कोण परत करणार आहे? सरकार त्यांना नुकसानभरपाई देणार आहे का? सीबीआय आरोपपत्र दाखल करेपर्यंत त्यांना तुरुंगातून सोडण्यात यावे अशी धक्कादायक मागणी केली आहे. 

यापूर्वीही रणजीत बहादूर श्रीवास्तव आरोपींचे समर्थन करत पीडितेला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. मुलीने मुलाला बाजरीच्या शेतात बोलावले असेल, कारण प्रेमप्रसंग होता. ही गोष्ट सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवरही आली आहे. मुलीला पकडले गेले असेल. 

शेतामध्ये असेच होते. ज्या मुली अशा प्रकारे मरतात, त्या काही मोजक्या ठिकाणीच सापडतात. या ऊसाच्या शेतात सापडतात, तुरीच्या शेतात सापडतात, बाजरीच्या शेतात, या नाल्यामध्ये सापडतात, झाडाझुडपांमध्ये सापडतात, जंगलात सापडतात, या तांदुळाच्या शेतात का सापडत नाहीत? गव्हाच्या शेतात मेलेल्या का सापडत नाहीत? असे वादग्रस्त सवाल उपस्थित केले आहेत. मुलगी दोषी नाही, मुले दोषी आहेत अशी आरोपींच्या समर्थनात व्यक्तव्य करत श्रीवास्तव यांनी मुक्ताफळे उधळली आहेत.

Post a Comment

0 Comments