प्रेरणादायी माणसं ! अन बापू सभापती झाले...बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती लक्ष्मण (बापू) संकपाळ यांच्या राजकीय जीवनाविषयी विशेष लेख


✒️प्रा. यशवंतराव श्रीहरी कोकाटे
लठ्ठे एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्था, सांगली
              
ग्रामीण भागातून एका शेतकऱ्याच्या आई-वडीलांच्या पोटी जन्म घेतलेला मुलगा शाळेतले शिक्षण ही तसं कमीच पण व्यावहारिक ज्ञान हे एका पदवीच्या शिक्षकाला लाजवेल असं आहे खरंच ग्रामीण भागातून आलेला हा तरुण घरची हलाखीची परिस्थिती असतानासुद्धा स्वतःच्या व्यक्तिमत्वावर राजकारणामध्ये ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे आज पाहिले जाते.
 त्या व्यक्तिमत्त्वाचं नाव म्हणजेच बार्शी तालुक्याचे लाडके नेते सर्वांच्या परिचयाचे शेतकऱ्यांच्या हितासाठी जगणारा व्यक्तिमत्व म्हणजेच बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती श्री लक्ष्मण (बापू) संकपाळ प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे नकारात्मक आणि सकारात्मक असे विचार दडलेले असतात. बापूंचे विचार मी लिहीत असताना तुम्हाला सांगत आहे, कारण हा तरुण ग्रामीण भागातून जनतेची नाळ जुळलेलं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं बापूंचा तसा परिचय माझा लहानपणाचा आणि त्यानंतर सामाजिक आणि राजकारणा मधला परिचय हा खूप जवळचा बापूंचा स्वभाव म्हणजे मनमोकळा स्पष्टवक्ता मनमिळाऊ त्याच बरोबर थोडा कडवट पण आहे. कारण एखाद्या व्यक्तीला बोलत असताना बापू छान बोलत असतात, पण तो व्यक्ती जवळच आहे किंवा लांबचा आहे हे कधी त्यांच्या डोक्यात येत नसतं कारण पुढच्या व्यक्तीला मदत करायच्या भावनेनेच बापू बोलत असतात. पण पुढचा व्यक्ती चुकीच्या भूमिकेत बोलत असेल तर बापू त्या क्षणाला त्या व्यक्तीला आपला कडवटपणा ही जाणून देतात, कारण या व्यक्तीचे वैशिष्ट्य सांगत असताना खूप हलाखीच्या परिस्थितीमुळे अण्णा माझं शिक्षण झालं नाही आणि शिक्षण नसल्यामुळे मी शेतात काम करण्याचं ठरवलं होतं आणि आताही करतो आहे.
पण राजकारणात हा प्रवेश बापूंचा हा धक्कादायक झाला असावा असं माझं मत आहे, कारण एखाद्या व्यक्तीचा राजकारणात प्रवेश होत असताना त्या पाठीमागे कारणे आणि उद्दिष्टे आणि त्यानंतर ध्येय लपलेली असतात. बापूंच्या माहितीप्रमाणे मला सांगितलेल्या गोष्टी म्हणजे ज्यावेळेस बापू पहिल्यांदा निवडणुकीला उभारले त्यावेळेस बापूचा ग्रामपंचायतच्या निवडणुकीला पराभव झाला, पण हा युवक संघर्षाने पेटलेली ज्योत असावी असं मला वाटतं हार कधीच न मानणारे  बापू कधीच नव्हते त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये उभारले आणि बापू एकटेच निवडून आले. माझ्या माहितीप्रमाणे पॅनल पूर्णच पडलं फक्त बापू निवडून आले, तिसऱ्या वेळेस बापूंच्या हातात ग्रामपंचायत आली आणि बापू सुद्धा निवडून आले. आणि त्याच वेळेस बापू पंचायत समिती सदस्य सुद्धा झाले आणि त्यानंतर हा कष्टातून आलेल्या व्यक्तिमत्व संघर्षाची डोक्यात असणारे आग व प्रत्येक गोष्टीत विचारपूर्वक घेणाऱ्या निर्णय याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण( बापू) संकपाळ बार्शी तालुक्याचे पंचायत समिती सभापती झाले. 
 बोरगाव मध्ये ज्यावेळेस बापूंचा सत्कार झाला त्या सत्काराचा मी साक्षीदार आहे त्यावेळेस बापूंचे व्यक्तिमत्व हे मे जवळून पाहिल्यामुळे भाषणांमध्ये सुद्धा बापूंचा उल्लेख आणि त्यांच्या कष्टाचे फळ मिळालं हेच सांगत होतो, कारण कष्टातून उभे राहणे राजकारण समाजकारण शेतकऱ्यांचे प्रश्न  रोज भेटणार्‍या माणसांना तोंड देणे त्यांना प्रत्येक गोष्ट समजून सांगणे ही बापूंच्या नसानसात भिडणारी गोष्ट होती. कारण हे व्यक्तिमत्व समजून घेत असताना मी प्रथमच म्हणलं प्रत्येक माणसाला नकारात्मक आणि सकारात्मक बुद्धीने पाहायलाच पाहिजे. पण लक्ष्मण बापूंचा स्वाभाव सांगत असताना मला हा व्यक्ती स्पष्टवक्ता मनमिळाऊ एखाद्या व्यक्तीने आपल्यावर टीका केली तर ती त्याच ठिकाणी विसरून जाणारा आणि त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला समजून सांगून त्या व्यक्तीला जीवनाची सहानुभूती करून देणार व्यक्तिमत्त्व म्हणून लक्ष्मण बापू मला पाहायला मिळाले. सभापती असताना बार्शी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातला कोणताही व्यक्ती त्यांच्याकडे गेला तर सभापती आहेत का किंवा साहेब आहेत का असा शब्द तो व्यक्ती कधीच म्हणत नसे तो व्यक्ती एक शब्द बोलत असे आणि तो म्हणजे "बापू"लहानापासून म्हाताऱ्या माणसापासून तरुणांपर्यंत आणि लहान मुलांपर्यंत सर्वांच्या मुखा मध्ये एकच नाव असतं. ते म्हणजे बापू समाजकरण्यापर्यंत राजकारणापर्यंत सर्व नेतेमंडळींच्या मुखातला शब्द म्हणजेच बापू पंचायत समिती मध्ये काम असो किंवा सोलापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यात  कोणतेही काम असो प्रत्येक व्यक्ती बापू हे काम झालं पाहिजे. 
हाच शब्द बापूच्या समोर सांगितला जातो, बापू शब्द पाळणारे शब्दाला जागणारा आणि शब्दाप्रमाणे वागणार व्यक्तिमत्व म्हणजे बापू लेखामध्ये बापूंचं नवल करतोय असेही काही नाही. पण प्रत्येक व्यक्तीचा राजकारणाची आणि समाजकारणाची विचारपूर्वक लिखाण करत असताना ते सत्य बाहेर यावं सत्या तून चांगला विचार बाहेर पडावा हाच प्रयत्न असतो. बापू संग बोलत असताना सकारात्मक ही गोष्ट सदैव जाणवत असते बार्शी तालुक्याचे भाग्यविधाते आणि विकास रत्न शेतकरी पुत्र शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणारा नेता श्री राजेंद्र विठ्ठल राऊत यांना मला आमदार करायचंय असं धाडसानं सांगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लक्ष्मण (बापू) संकपाळ खरंच या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. रामायणामध्ये लक्ष्मण आणि राम हे दोन व्यक्तिमत्व होते खरंच ज्या लक्ष्मणाने स्वप्न पाहिलं होतं, प्रभुराम यांना त्या गादीवर सिंहासनावर बसवायच खरंच बार्शी तालुक्याच्या राजकारणात आणि समाजकारणात हा योगायोग नक्कीच पाहायला मिळतो राजाभाऊ राऊत हे मला रामाच्या भूमिकेत दिसतात, आणि त्यांच्या पाठीमागे धाडसानं उभा असणार लक्ष्मण म्हणजेच लक्ष्मण (बापू )संकपाळ दिसतात माझी आणि बापूंची बार्शीच्या राजकारणाविषयी चर्चा होत असताना आणि त्यानंतर राजाभाऊ राऊत यांचा विषय निघताच लक्ष्मण बापूंचा शब्द पहिला असायचा, आणि तो म्हणजे "अण्णा आपल्याला राजाभाऊ राऊतांना आमदार करायचं आहे "ज्यावेळेस राजाभाऊ आमदार होतील तेव्हा खरच माझा जीव मोकळा झाला असे आदरणीय बापू म्हणायचे निष्ठावंत असणारा हा कार्यकर्ता सदैव राजाभाऊ राऊतांच्या सावलीप्रमाणे राहणारा व्यक्तिमत्व आहे भाऊ राम तर लक्ष्मण बापू संकपाळ हे खरेच लक्ष्मण दिसतात असणारे व्यक्तिमत्व आहे.
 कोणत्याही व्यक्तीचा फोन बापूंना आला, तर त्या फोनवर वाक्य पहिले असतं बोला तुमचं काम काय आहे ते सांगा कारण जनसामान्यांची शेतकऱ्यांची गरिबांची कोणत्याही अडचणीची कामे करण्यासाठी हा व्यक्ती सदैव तयार असतो. याचंच मला नवल वाटतं बापूंच्या व्यक्तिमत्वावर हा लेख लिहित असताना त्यांच्यासोबत त्यांच्यासमोर  बोलत असताना केलेलं निरीक्षण आणि विश्लेषण आहे, कारण ज्यावेळेस मी लक्ष्मण (बापू) संकपाळ यांच्याबरोबर असतो, तेव्हा ह्या ग्रामीण नेत्याचा मी नक्कीच अभ्यास करत असतो आणि तो अभ्यास आज ह्या लेखाच्या माध्यमातून विश्लेषण केलं आहे.

Post a Comment

0 Comments