तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेविका हे कर्मचारी गौंडरे गावांत निवासी राहण्यासाठी जय हनुमान संस्थेमार्फत तहसीलदार यांना निवेदन


गौंडरे/प्रतिनिधी:

कोरोना सारख्या महामारीच्या काळात आरोग्य सेवेचा एकही लाभ गावांतील लोकांना मिळाला नाही, गावांत अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असताना तलाठी गावांत आढळून येत नाहीत,   मोक्याच्या वेळी स्थानिक पातळीवर कर्मचारी गैरहजर राहतात, याबाबत सविस्तर चौकशी करुन संबंधिता वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सदरील निवेदन तहसीलदार करमाळा यांना देण्यात आले, ह्या निवेदनावर अक्षय हनपुडे, सोमनाथ जगताप, नवनाथ कापले, ज्ञानेश्वर बिचितकर, दत्तात्रय हनपुडे, अभिजीत धोंडे, माधव हनपुडे, प्रकाश हनपुडे स्वाक्षऱ्या आहेत. ह्या निवेदनाच्या प्रति गट विकास अधिकारी करमाळा, जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर यांनाही पाठवून देण्यात आले.

Post a Comment

0 Comments