आनंदवार्ता :अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी रस्ता कामाच्या चौपदरीकरणास मंजुरी - आमदार संजय शिंदे


करमाळा/प्रतिनिधी:

अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी या रस्ता कामाच्या चौपदरीकरणास मंजुरी देण्यात आली आहे. जुन्या सुप्रिम कंपनीचे काम काढून हे काम मे. कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्‍चर लि. या कंपनीला देण्यात आले आहे. महिनाभरात या महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची माहिती आमदार संजय शिंदे यांनी दिली. 

आमदार संजय शिंदे म्हणाले, या रस्त्यावर होणारे अपघात व अपघातात होणारे मृत्यू लक्षात घेता आपण आमदार झाल्यानंतर पहिल्याच विधिमंडळाच्या अधिवेशनात अहमदनगर - करमाळा - टेंभुर्णी या रस्त्याविषयी आवाज उठवला. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे व बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर करमाळा - टेंभुर्णी या रस्त्यासंदर्भात बैठक घेतली. 

या बैठकीत या विषयावर मार्ग काढण्याचा निर्णय झाला होता. रस्ताचे काम सुरू केल्यानंतर २०२२ पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्याचे बंधन संबंधित कंपनीवर असल्याने वेळेत काम पूर्ण होणार आहे. 

Post a Comment

0 Comments