“...मग संजय राऊत कित्येक वेळा महाराष्ट्राचा अपमान केलाय ” मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली. या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

संदीप देशपांडे यांनी संजय राऊत आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीदरम्यानचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत संजय राऊत हे राज्यपालांना वाकून दंडवत घालताना दिसत आहेत. महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ते लोकनियुक्त मुख्यमंत्री आहेत. पण असं असताना काही लोक मुख्यमंत्र्यांना भेटत नाहीत. त्याऐवजी लोकांचे प्रश्न घेऊन थेट राज्यपालांना भेटतात, असं राऊत म्हणालेत.Post a Comment

0 Comments