मराठा आरक्षणाची सुनावणी आता सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या खंडपीठाकडे होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी ५ न्यायमूर्तींचं खंडपीठ गठित करण्यात यावे अशा मागणीचा अर्ज करण्यात आला होता. ती मान्य करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ वकील संदीप देशमुख यांनी दिली, विनोद पाटील यांच्या वतीने त्यांनी बुधवारी सुप्रीम कोटात अर्ज केला होता.
यानंतर सरन्यायाधीश आता मोठं खंडपीठ स्थापन करणार असून त्यातल्या न्यायाधिशांची नावे ठरविण्याचा अधिकारही त्यांना आहे.
अर्ज सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आला होता. यावर सर्वोच्च न्यायालयातील रजिस्ट्री ने मान्य करून सदरील प्रकरण पाच न्यायमूर्ती कडे पाठवलेला आहे. कॅटेगरी बदलली आहे. मराठा आरक्षणाबाबत एक टप्पा आज पार झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
0 Comments