शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासह विविध मुद्यांवरून भाजपावर टीका केली. यानंतर आता भाजपा नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिलं जात आहे. शिवाय, हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेना पक्षप्रमुखांवर निशाणा साधला जात आहे. खुर्चीसाठी हिंदुत्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
”राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल दसरा मेळाव्यात आपली अर्वाच्य भाषा एका अभ्यासशून्य व भाषणातुन सादर केली. राज्यप्रमुख असूनही आपल्या भाषणात एकही सेकंद शेतकऱ्यांसाठी दिला नाही, मग त्या पदाचा काय उपयोग?” असं ट्विट करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
0 Comments