सांगोल्यातील खिल्लारी गुरांचा बाजार ८ महिन्यांनी पुन्हा सुरू, दीड कोटी रुपयांची उलाढाल!सांगोला/प्रतिनिधी:

कोरोनामुळे अडचणीत आलेल्या पशुपालकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिलासा देत जनावरांच्या बाजाराला परवानगी दिली,पश्चिम महाराष्ट्रत प्रसिद्ध असलेला सांगोल्याती खिलार गुरांच्या बाजारात दीड कोटीची उलाढाल झाली आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर सांगोला कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये खिलार खोंडे , बैले , म्हशी आणि इतर जनावरे मोठ्या संख्येने या बाजारात दाखल झाली होती. 

इतक्या दिवसांनी बाजार भरल्याने खरेदी विक्रीही जोरात झाली असून आज पहिल्याच दिवशी  दीड कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल झाली असल्याचे बाजार समितीचे सभापती गिरीश गंगथडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments