निवडणूक प्रचारासाठी मला ब्लॅकमेल केलं - अमिशा पटेल


बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती चक्क बिहार विधानसभा निवडणूकीचे उमेदवार डॉ. प्रकाश चंद्रा यांच्यामुळे चर्चेत आहे. त्यांनी अमिशाकडून जबरदस्तीने निवडणूकीचा प्रचार करुन घेतला. शिवाय बलात्काराची धमकी देखील दिली. असा खळबळजन आरोप तिने केला आहे.

LJP नेता प्रकाश चंद्रा यांनी आपल्या निवडणूक प्रचारासाठी स्टार प्रचारक म्हणून अमिशा पटेल हिला बोलावलं होतं. २६ ऑक्टोंबर रोजी तिने चंद्रा यांच्यासाठी प्रचार केला. परंतु हा प्रचार तिच्याकडून जबरदस्तीने करुन घेण्यात आला. बिहारमध्ये बोलवून तिला ब्लॅकमेल केलं गेलं असा आरोप अमिशाने केला आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीत तिने या प्रकरणावर भाष्य केलं.

ती म्हणाली, “सुरुवातीला मला पटनाजवळ प्रचार करण्यास सांगितलं होतं. परंतु त्यानंतर मला न सांगता ठिकाण बदललं व ओबरा येथे घेऊन गेले. ठरल्याप्रमाणे तिथून संध्याकाळी मी निघणार होते. परंतु त्यांनी मला जाऊ दिलं नाही. उलट धमक्या देऊन माझ्याकडून आणखी प्रचार करुन घेतला. या प्रचारात मला अत्यंत वाईट अनुभव आले. मला ते त्या ठिकाणी एकटीला सोडतील. शिवाय माझ्यावर बलात्कारही होऊ शकतो. अशी धमकी त्यांनी मला दिली होती.”

Post a Comment

0 Comments