राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा सामाजिक न्याय विभागाच्या निवडी जाहीर


करमाळा/प्रतिनिधी: 

आज राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा सामाजिक न्याय विभागाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.निवडीची पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड अजिनाथ शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा मतदार संघाचे अध्यक्ष भोसेचे सरपंच भोजराज सुरवसे,राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्याक्ष गणेश कांबळे,तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव, जिल्हा सरचिटणीस किशोर नवगिरे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य अविनाश वाघमारे,शहर अध्यक्ष ओंकार पलंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली.

यामध्ये तालुका कार्यकारिणी सदस्य पदी रामचंद्र लोंढे(कंदर),शहर उपाध्यक्ष पदी आंनद कांबळे,शहर सरचिटणीस पदी अक्षय ननवरे,शहर कार्यकारिणी सदस्य पदी गणेश शेवंते,शहर उपाध्यक्ष पदी बाळासाहेब सुकळे यांच्या निवडी करण्यात आल्या.यावेळी सचिन गळगटे,अशोक सुर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments