अतिवृष्टी मूळे नुकसान झालेल्या ऊस व केळी पिकांचे पंचनामे करून तात्काळ भरपाई द्यावी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेची मागणी....


करमाळा तालुक्यातील अतिवृष्टी मूळे झालेल्या ऊस, केळी तसेच जमिनी वाहून गेलेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तलाठी व कृषी विभागाला द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष  भाऊसाहेब झोळ यांनी केली आहे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठे जनआंदोलन उभा करीन.
परतीच्या पावसाने वाशिंबे परिसरात हाहाकार माजवला आहे, शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.

उभ्या पिकातील ठिबक संच वाहून गेले आहेत त्याचे पण पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी. - विक्रम जगदाळे वाशिंबे

Post a Comment

0 Comments