शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ वतीने माजी आमदार दिपक आबा साळुंखे यांना निवेदन



विविध प्रश्न मार्गी लावण्याचे माजी आमदार साळुंखे यांचे आश्वासन 


सोलापूर जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या वतीने सांगोला तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक आबा साळूंखे पाटील यांना निवेदन देण्यात आले. दिपक आबा साळूंखे पाटील यांनी सविस्तर चर्चा करून शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख पदाधिकारी वर्गाचे व मंत्रीमहोदय यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या पदाधिकारी व अभ्यासू शिष्टमंडळ याची मिटिंग लावून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

माजी आमदार दिपक आबा साळूंखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी नवनिर्वाचित सांगोला तालुका अध्यक्ष वैभव देशमुख, सचिव वैभव केदार त्यांचे सर्व सहकारी तसेच सोलापूर जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघचे अध्यक्ष प्रदिप नवले , सचिव सचिन गोतसुर्य व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पंढरपूर वरून गणेश बागल, विजय सरगर उस्मानाबाद जिल्ह्यातून  राम चोबे  उपस्थित होते.

अध्यक्ष प्रदिप नवले म्हणाले की, शिक्षण व्यवस्थेमध्ये गेल्या दहा वर्षांपासून क्रीडा शिक्षक पद भरती खूपच कमी प्रमाणात झाली आहे . या संदर्भामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक कसा आवश्यक आहे,
आणि शारीरिक शिक्षण विषय हा समाजासाठी बलशाही भारतासाठी ऑलम्पिक मध्ये भारताला  पदक मिळवण्यासाठी का गरजेचे आहे हे त्यांनी नमूद केले. 
आता सध्याच्या कोविड-१९ जागतिक महामारी ची  पार्श्वभूमी पाहता आज प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढणे अत्यंत गरजेचे आहे.

आणि ती वाढण्यासाठी व्यायाम किंवा शारीरिक हालचाली तसेच शारीरिक शिक्षण अत्यंत गरजेचे आहे असे आपल्याला दिसून येत आहे . आणि अशा परिस्थितीमध्ये  शारीरिक शिक्षण हा विषय कसा गरजेचा आहे हे त्यांनी यावेळी सांगितले.

 विजय सरगर यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, आता जे काही नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण निर्माण झालेल आहे, त्याच्यामध्ये क्रीडा व योग याचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतु क्रीडा व योग हा शारीरिक शिक्षणाचा भाग आहे. 

आणि यामध्ये देखील शारीरिक शिक्षण शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी.योगाचे शारीरिक शिक्षणात शारीरिक शिक्षण प्रशिक्षण देण्यात यावे,असे त्यांनी यावेळी नमूद केले.
कार्याध्यक्ष अमोल मिरगणे व  गणेश बागल यांनी शारीरिक शिक्षकांच्या सध्य स्थितीच्या व्यथा मांडल्या.

Post a Comment

0 Comments