रोहितला काय झालंय हे चाहत्यांना कळू द्या, सुनील गावसकर कडाडलेऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची २६ ऑक्टोबरला घोषणा करण्यात आली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि हिटमॅन असलेला रोहित शर्माला या दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. रोहित दुखापतग्रस्त असल्याने त्याची निवड न केल्याचे सांगितले जात आहे. 

यानंतर मुंबई इंडियन्सच्या ट्विटवरुन रोहित शर्मा नेट्समध्ये सराव करत असल्याचे फोटो शेअर करण्यात आले. या फोटोनंतर क्रिकेट विश्वात अनेक चर्चांना उधाण आलं.

 जर रोहित नेट्समध्ये सराव करतोय, तर त्याला अशी कोणती दुखापत झालीये, ज्यामुळे तो खेळू शकत नाही, अशा चर्चांना सुरुवात झाली. सुनील गावसकर रोहितची निवड न केल्याने संतापले आहेत. तसेच रोहितची निवड न झाल्याने चकित आहेत. 

Post a Comment

0 Comments