लवकरच नागराज मंजुळे पोस्टमनच्या वेषात प्रेक्षकांच्या भेटीला येणार


 लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता नागराज मंजुळे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. रितेश देशमुख निर्मित ‘तार’ हा लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे पोस्टर अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडियावरून प्रदर्शित केले आहे. यात नागराज मंजुळे सायकल वरून पत्र पोहोचवणाऱ्या पोस्टमनच्या भुमिकेत दिसणार आहे.

रितेशची निर्मिती संस्था ही मुंबई फिल्म कंपनी या नावाने ओळखली जाते. रितेशच्या या निर्मिती संस्थेखाली काही मराठी लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याच निर्मिती संस्थेचा पोस्टमनची गाथा सांगणारा ‘तार’ हा पहिला लघुपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या लघुपटात नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सध्याच्या काळात दुर्मिळ होत चाललेला पोस्टाचा डबा, बंद पडलेली तार सेवासह पोस्टमन काकांची कथा या लघुपटात पाहायला मिळणार आहे. नागराज मंजुळे ‘नाळ’ चित्रपटानंतर ‘तार’ या लघुपटात झळकणार आहे. ‘तार’ या लघुपटाचे दिग्दर्शन युवा दिग्दर्शक पंकज सोनावणे यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments