अखिलेश यादव यांची भेटणारे ७ आमदार बसपामधून निलंबितबहुजन समाज पार्टीच्या ७ आमदारांनी सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे उत्तर प्रदेशातील राजकारण तापलं आहे. तर या ७ आमदारांना बसपातून निलंबित करण्यात आलंय.

बसपाच्या प्रमुख मायावती म्हणाल्या, “विधान परिषद निवडणुकीत सपाच्या उमेदवारांना हरविण्यासाठी बसपा पूर्ण ताकद लावणार आहे. याप्रसंगी भाजपा आणि अन्य कोणत्याही विरोधी पक्षाला मत देण्याची वेळ आली तरी चालेल.”

दरम्यान मायावती यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना सपाचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले की, मायावती यांच्या विधानावरून त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी असल्याचं स्पष्ट होतंय.

Post a Comment

0 Comments