करमाळा! मास्क न वापरल्यास होणार ५०० रुपये दंड



करमाळा/प्रतिनिधी:

आपणा सर्वांना माहीतच आहे की, सोलापूर जिल्ह्यात व करमाळा तालुक्यात कोरोनाव्हायरस मुळे अनेक जण प्राणाला मुकले आहेत. तरीदेखील बऱ्याच लोकांना कोरोना व्हायरसचे गांभीर्य नाही असे स्पष्ट दिसून येते. 

लोकांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल वापरावा म्हणून यापूर्वी न वापरणाऱ्यांना १००/- रुपये दंडाची कारवाई करण्यात येत होती. १००/- रुपये दंड बऱ्याच जणांना किरकोळ रक्कम वाटते, त्यामुळेच मास्क किंवा रुमाल वापरण्याचे प्रमाण फारच कमी दिसून येत होते. आपण मास्क किंवा रुमाल न वापरल्यामुळे दुसऱ्याला कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते याचे गांभीर्य बऱ्याच लोकांना नसल्याने माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर यांनी दिनांक २४ ऑक्टोबर २०२० रोजी आदेश काढला असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३४ आणि कलम ६४ मधील तरतुदी अन्वये सोलापूर जिल्ह्यातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणे कामी  सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क किंवा रुमाल न वापरणाऱ्या व्यक्तींवर रुपये ५००/- इतकी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद केले.

तरी सर्व नागरिकांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी व सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क किंवा रुमाल वापरावा. उल्लंघन केल्यास त्यांना ५००/- रुपये दंड आकारण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी असा आदेश श्रीकांत पाडुळे पोलीस निरीक्षक,करमाळा पोलीस स्टेशन पाळावा सूचना दिली आहे.

Post a Comment

0 Comments