जतभरचौकात गोळ्या झाडून गुंडाचा खून, अनैतिक संबंधातून घटना....



 जत तालुक्यातील कंठीमध्ये भर चौकात रेकॉर्ड वरील गुन्हेगार धनाजी नामदेव मोठे (वय ४२ ) याचा निर्घृणपणे गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे.यामुळे जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
जत पोलिसांनी या प्रकरणी संशयित चौघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अनैतिक संबंधाच्या कारणास्तव हा खून झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
    
अधिक माहिती अशी की, धनाजी मोठे याचं गावातील एका अविवाहित मुलींशी अनैतिक सबंध होते. या कारणातून मुलीच्या घरच्या लोकांमध्ये व धनाजी मोठे यांच्यात सारखा वाद होत. याप्रकरणी आगोदर मुलीच्या घरच्यांनी जत पोलीस ठाण्यात धनाजी मोठे याच्यावर गुन्हा दाखल केले होते. 

सतत मुलीशी छळ काढत असल्याने घरच्यांनी त्याचा राग मनात धरून गुरुवारी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास गावातील आंबेडकर समाज मंदिरासमोर भर चौकात गुन्हेगार धनाजी मोठे याला अडवून गोळ्या झाडून व डोक्यावर दगडाने ठेचून त्याचा निर्घृणपणे खून केला आहे. घटनास्थळी एक गावठी पिस्तुल चार,बंदुकीच्या गोळ्या मिळून आले आहेत.हे पिस्तुल नेमकं आरोपीची का मयताच हे पोलिसांच्या तपासात स्पष्ट होणार आहे.
    

Post a Comment

0 Comments