अल्पवयीन मेहुणीचं केलं बहिणीच्या नवऱ्याने अपहरणपुण्यातील सिंहगड परिसरात एका अल्पवयीन तरुणीचे तिच्या बहिणीच्या नवऱ्यानेच अपहरण केल्याची घटना घडली आहे. अरुण संजय काळे (वय २४) असे आरोपीचे नाव असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अपहरण झालेल्या तरुणीच्या आईने फिर्याद दिली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून त्यांना चार मुली आहे. या चार मुलीपैकी मोठ्या मुलीचे लग्न आरोपी अरुण संजय काळे याच्याशी झाले आहे. त्याला दोन मुले आहे. तर फिर्यादी या भाजी विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने, त्यांना मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यास जावे लागत. असच त्या मागील आठ दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास भाजी खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या.

 १७ वर्षीय मेहुणीला बाहेर बोलवून घेऊन गेला. त्यानंतर फिर्यादी या कामावरून घरी आल्यावर आजूबाजूला शोध घेतला असता. काही तपास लागला नाही. आज नाही तर उद्या येईल असे वाटले. मात्र ती आलीच नाही. त्यामुळे अखेर त्यांनी जावयाविरोधात तक्रार दिली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अपहरण झालेल्या तरुणीचा शोध घेतला जात असल्याचे सिंहगड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल काळे यांनी माहिती दिली.

Post a Comment

0 Comments