करमाळा तहसीलदार समीर माने याच्यांकडून नुकसान ग्रस्त भागांची पाहणी व पंचनामे सुरु



करमाळा/प्रतिनिधी:

करमाळा तालुक्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी घरे पडली आहेत.करमाळा तालुक्यातील नुकसान झालेल्या भागाची पहाणी तहसीलदार समीर माने यांनी सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू केली असून नुकसान झालेल्या सर्व भागाचे पंचनामे करण्यात येतील, अशी माहीती तहसीलदार समीर माने यांनी दिली आहे.
 
मुसळधार पावसाने तालुक्यातील मांगी, वीट, राजुरी, कुंभारगाव, सावडी, कोर्टी, केम, वडशिवणे, नेरले, साडे, उमरड सालसे या भागातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. याशिवाय कुंभेज येथे दहीगांव उपसा सिंचन योजनेचा कॅनल फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे अनेक शेतक-यांची शेती वाहिली आहे.

शेतात जागोजागी पाणी साठले असून या साठलेल्या पाण्यामुळे कांदा, ज्वारी, मका, ऊस, केळी या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे शेती वाहून गेली आहेत. नुकसान झाल्यास भागाची तहसीलदार समीर माने यांनी महसुल विभागाचे मंडलाधिकारी व तलाठी यांना घेऊन पहाणी सुरू केली आहे. तहसीलदार समीर माने यांनी सकाळी साडेसात वाजता कुंभेज येथील फुटलेला दहीगांवचा कॅनाॅल, तसेच जेऊर, लव्हे, कोंढेज या गावांना भेटी दिल्या आहेत. करमाळा शहरात सर्व रस्त्यावरून पाणी वाहिले आहे. माञ कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.

Post a Comment

0 Comments