‘त्या’ शर्टलेस फोटोशूटमुळे जगातील सर्वात तरुण पंतप्रधान वादात; ‘तिला’ महिलांचे समर्थन तर पुरुषांचा विरोधफिनलँड  बरोबरच जागतिक राजकारणामध्ये इतिहास घडवणाऱ्या आणि याच वर्षी जानेवारी महिन्यात जगातील सर्वात तरुण पंतप्रधान  होण्याचा मान मिळवणाऱ्या सना मरीन यांचे एक फोटोशूट सध्या वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी पंतप्रधान पदी विराजमान झालेल्या सना यांनी ट्रेण्डी या मासिकाच्या ऑक्टोबरच्या पुरवणीसाठी विशेष फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये त्यांनी लो नेक ब्लेझर घातलं होतं.
 मात्र त्यांनी ब्लेझरच्या आतमध्ये शर्ट घातलं नव्हतं. त्यामुळेच आता या मासिकाबरोबरच साना यांच्यावरही टीका होताना दिसत आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे त्यांना पाठिंबा देत अशाच प्रकारचे स्वत:चे लोक नेक कपडे घालून पोस्ट करणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. त्यामुळेच आता या शर्टलेस फोटोशूटवरुन दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे.

ट्रेण्डीच्या प्रकाशक असणाऱ्या ए-लेहडेट ओए या माध्यम समुहाच्या महिला संचालक असलेल्या मारी पॅलोसॅलो-ज्युसिनमाकी यांनी सीएनएनशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये या फोटोशूटमुळे आणि मासिकाच्या कव्हर पेजमुळे आमच्यावर टीका होत असल्याचे म्हटले आहे. ९ ऑक्टोबर रोजी हे मासिक प्रकाशित झाल्यानंतर सोशल मीडियावरुन अनेकांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केल्याचे मारी सांगातत. वर वर सांगायचे झाल्यास पुरुषांच्या मते हा फोटो चुकीचा आहे तर महिलांना हा फोटो फार आवडला आहे असंही मारी यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments