"एक दारुडाच दुसऱ्याला दारुडा म्हणू शकतो" रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना लागवला सणसणीत टोला...



पंढरपूर/प्रतिनिधी:

 'एक दारुडाच दुसऱ्याला दारुडा म्हणू शकतो, असा सणसणीत टोला रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीच नेते अड. प्रकाश आंबेडकर यांना आज लगावला.आठवले यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टिकेचा खरपूस समाचार घेतला. आठवलेंच्या या वक्तव्याने पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

 चंद्रभागा नदीपात्रा जवळील घाट कोसळल्याने मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांची भेट घेण्यासाठी केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले पंढरपूरला आले होते.

पत्रकाराशी संवाद साधताना आठवले म्हणाले ,जरी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले तरी त्यांच्या सोबत कुणी जाणार नाही. आणि जरी गेले तर त्यांना काही मिळणार नाही. भाजपमध्ये देखील इनकमिंग सुरु होईल असा आशावाद आठवले यांनी व्यक्त केला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांना जवळ करण्याचा प्रश्नच येत नाही. त्या उलट राज ठाकरे यांना जवळ केले तर भाजपचे मतदार कमी होतील असेही आठवले म्हणाले़. अभिनेत्री कंगना राणावत ही राष्ट्र विरुद्ध बोलल्याने न्यायालयाने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तिच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नसल्याचे केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

दरम्यान ,मंत्री आठवले यांनी आज अतिवृष्टी झालेल्या भंडीशेगाव येथे जावून नुकसान झालेल्या पिकांची आणि फळबांगाची पाहणी केली.

यावेळी राजाभाऊ सरवदे,सुनील सर्वगोड, आप्पासाहेब जाधव, किर्तीपाल सर्वगोड, संतोष पवार, जितेंद्र बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

1 Comments