बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्यात जागांसाठी मतदान होणार आहे. अशातच अभिनेता आणि गरजुंना मदतीचा हात देणाऱ्या सोनू सूदने बिहारच्या जनतेला मतदान करताना मोलाचा सल्ला दिला आहे.
ज्या दिवशी बिहारमधील नागरिकांना कामासाठी इतर राज्यांत जावं लागणार नाही. उलट काम मिळवण्यासाठी इतर राज्यांतील लोक बिहारमध्ये येतील तेव्हा खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल, असं सोनू सूदने म्हटलं आहे.
वोटिंग मशीनचं बटण दाबताना बोटाचा नाही तर मेंदूचा वापर करा, असा सल्ला सोनूने बिहारच्या जनतेला दिला आहे. सोनू सूदचं हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.
0 Comments