बेकायदेशीरपणे पिकअपमधून ३१ जनावरे जाणाऱ्यावर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


सांगोला/प्रतिनिधी:

सांगोला येथील जनावरांच्या बाजारात खरेदी केलेली ३१ जनावरे बेकायदेशीरपणे पिकअपमधून नेत असताना पोलिसांनी अचानक छापा टाकून नऊ जणांना रंगेहाथ पकडले. सांगोल्यातील जनावरांच्या बाजारातून ३१ जनावरे खरेदी करून त्यापैकी १७  जनावरे पिकअपच्या हौद्यात दाटीवाटीने तसेच इतर १४ जनावरेही बेकायदेशीरपणे कत्तल करण्यासाठी घेऊन जाण्याच्या उद्देशाने सांगोला मार्केट यार्ड बाजार समितीच्या मागे चिलारेच्या झाडाला दोरीने घट्ट बांधून ठेवली होती. या दोन्ही ठिकाणीची पोलिसांनी ३१ जनावरे पकडली असून याबाबत दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी पोलिसांनी सौरभ शिंदे (आंधळगाव), दत्ता कसबे (लक्ष्मीदहिवडी,ता.मंगळवेढा), वीर बनसोडे , दादा बनसोडे, स्वप्निल कांबळे (भीमनगर , सांगोला),अलीम आयुब कुरेशी , आयुब कुरेशी , शाहीबाज फारूक कुरेशी,आयर्न दर्शन दळवी (रा.अकलूज) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 अधिक माहिती अशी की, पोलिसांना जुना सावे रोड, सिंदखाना भीमनगर, सांगोला येथून एका पांढऱ्या रंगाच्या पिकपमध्ये जनावरे भरून ती कत्तल खाण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत घुले यांच्यासह पोलिसांनी जुना सावे, भीम नगर येथे १७ जनावरे पिकअप (क्रमांक एमएच ४५/२२९५) मध्ये  बेकायदेशीरपणे कत्तल करण्यासाठी घेऊन जाण्याच्या उद्देशाने दिसली. तसेच यावेळी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सांगोला मार्केट यार्ड बाजार समितीच्या मागे चिल्लारीच्या झाडाच्या आडोशाला अपुऱ्या जागेत १४ जनावरे बांधून ठेवल्याची माहिती आले. याबाबत पोलिसांनी एकूण ३१ जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने मिळून आली. पोलिसांनी १ लाख ८६ हजार रुपये किंमतीची जनावरे व एक लाख ५० हजार रुपये किंमतीचा पिकअप असे एकूण तीन लाख ३६ हजार रुपयांचा माल ताब्यात घेतला.

Post a Comment

0 Comments