श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी संस्थेचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रउभारणी प्रेरणा पुरस्कार २०२० हा राज्यस्तरीय पुरस्कार ड्रीम फाउंडेशन सोलापुर यांच्या वतीने माजी आमदार शिवशरण आण्णा पाटील, उद्योगपती सिध्देश्वर गड्डम, नगरसेविका संगीता जाधव व ड्रीम फाऊंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
________________________________________
📢
(Advertise)
__________________________________________
रणजीत महादेव पाटील यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांनी केलेल्या कामाच्या १०० पेक्षा अधिक बातम्या वर्तमान पत्रातुन प्रसिध्द झाल्या आहेत. तसेच नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळामध्ये कोरोना जनजागृती करण्याचेही काम त्यांनी केले आहे.पर्यावरण पूरक उपक्रम, वृक्षारोपण,व्यसनमुक्ती,बचत गट निर्मिती,स्वच्छ भारत अभियान,कोरोना जनजागृती अशा या वेगवेगळ्या विषयावर त्यांचे काम सुरु आहे.त्यांनी कोरोनाच्या काळात विशेष कार्य केले आहे. जगभरात कोरोना या आजाराने हाहाकार माजवला होता.
नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत अन्नधान्य संकलन, कोरोना जनजागृती, भटकंती करणाऱ्या ६ मेंढपाळ बांधवांना धान्य देण्यात आले. तसेच कपिलापुरी सारख्या खेडे गावात राहून संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रहित उपक्रम सातत्याने करत आहेत.या सर्व कार्याचा आढावा घेऊन रणजीत पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
महा एन जी ओ फेडरेशनचे अध्यक्ष शेखरजी मुंदडा यांनी रणजीत पाटील यांच्या कार्याचा गौरव केला या प्रसंगी
समाधान लटके,अनिल ठोंबरे उपस्थित होते.राष्ट्रउभारणी प्रेरणा पुरस्कार २०२० हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 Comments