कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे हॉस्पिटलमधील ट्रॉमा केअर युनिटसाठी इर्लेकरांच्या वतीने दीड लाखांची देणगी


वैराग/प्रतिनिधी:

इर्लेकरांच्या वतीने ३ ऑक्टोबरला कार्यक्रमाचे आयोजन करून मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव, संस्थेचे सचिव श्री. जयकुमार शितोळे, खजिनदार श्री. रेवडकर, डॉ. जगताप उपस्थित होते. इर्ले गावातून १३० देणगीदारांनी यासाठी योगदान दिले . 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच साहेबराव आडगळे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संतोष पाटील यांनी केले. प्रा. डॉ. भास्कर कापसे यांनी बार्शी भागातील सामान्य नागरिकांच्या रुग्णसेवेबाबत अपेक्षा याबाबत मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात इर्ले गावातील नूतन डॉक्टर डॉ. प्रगती कापसे आशा सेविका सौ. बालिका डुरे यांचा डॉ. यादव यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी सचिव श्री. शितोळे, डॉ.जगताप, सुशांत डुरे पाटील, प्रशांत डुरे पाटील, समाधान काजळे, डॉ. मनोज पंके, श्री धनाजी डोईफोडे यांनी आपले विचार व्यक्त केले. डॉ.यादव यांनी देणगी प्रति कृतज्ञता व्यक्त करताना भविष्यात हॉस्पिटल मध्ये कोणकोणत्या सोई सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत ? ट्रॉमा केअर सेंटरसाठी अपेक्षित खर्च आदींबाबत मार्गदर्शन केले. सुधीर गायकवाड सर व किशोर पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

यावेळी ज्येष्ठ नेते भाई सुभाषआण्णा डुरे पाटील, दिनकर काका पाटील, इर्ले, सुर्डी, वैराग आदी गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन पाटील,बबन डुरे,समाधान डुरे,बालाजी डुरे,माऊली डुरे,कचरू आडगळे,पंकज सरवदे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments