परांडा! टाकळीमध्ये शहीद वामन मोहन पवार यांच्या स्मारकाचे भूमिपूजन...



परांडा/प्रतिनिधी: 
  
छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, समाज परिवर्तन महासंघ, आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना यांच्या माध्यमातून, उरी येथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये वीरमरण प्राप्त झालेले, शहीद वामन मोहन पवार यांच्या स्मारकाचे भूमिपूजन त्यांच्या जन्मगावी टाकळी ता. परांडा येथे करण्यात आले. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद वामन पवार यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शहीद वामन पवार यांचे स्मारक येणाऱ्या नविन पिढीसाठी आणि देशासाठी प्रेरणादायी ठरेल, असा मानस आणि विचार करून या स्मारकाची निर्मिती करताना कुठल्याही प्रकारचा शासकीय निधी न घेता किंवा कोणत्याही प्रकारची वर्गणी जमा न करता, स्वखर्चाने शहीद स्मारक उभा करण्याचा दृढ निश्चय छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे मुख्य मार्गदर्शक आणि आधारस्तंभ प्रतिष्ठनचे सचिव शिवश्री रामचंद्र भगवान पवार यांनी केला. 
या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात आणि भूमिपूजन श्री क्षेत्र  सोनारी येथील काळभैरवनाथ देवस्थानचे मठाधिपती श्री श्री श्री जगतगुरू शामनाथ महाराज यांचे शुभहस्ते व प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा शिवश्री रामचंद्र पवार, संस्थापक अध्यक्ष धनंजय वळेकर, स्मारकाचे मुख्य सूचक आणि समाज परिवर्तन महासंघाचे अध्यक्ष अजय पवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानचे कायदेशीर सल्लागार अँड.अनंत राशिनकर, शिवनेरी पब्लिक स्कुलचे संस्थापक धिरज शेळके, महेश ठोंगे, सचिन पाटील, श्रीराम गोडगे, हनुमंत कातुरे, प्रदीप घोडके, रवींद्र शिंदे, नानासाहेब देवकर, अमोल जगताप, राजाराम माने, संघटनेचे  सर्व पदाधिकारी, टाकळी येथील सरपंच, उपसरपंच, पवार कुटुंबीय आणि टाकळी परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments