सोने, चांदीच्या दरात घसरण; दिवाळीत वाढणार मागणी


भारतीय बाजारपेठेतील सोने, चांदीच्या दरात आज घट दिसून आली आहे. अमेरिकन डॉलर USD वधारल्याने मौल्यवान धातूच्या किंमतीत घट होताना दिसली आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत गुंतवणुकदारांचा ओढा अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यावर दिसला. एमसीएक्सवर डिसेंबरमधील सोन्याचे दर ०.३ टक्क्यांनी घसरुन ५० हजार ६७९ प्रति १० ग्रॅम झाले तर चांदीचे दर  १.१२ टक्क्यांनी कमी होऊन प्रति किलो ६१हजार ७४९ वर गेले आहेत. 

ऑगस्ट महिन्यात सोन्याचे भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर म्हणजे प्रति १० ग्रॅमला ५६ हजार २०० पर्यंत गेले होते. पण मागील काही आठवड्यांपासून सोन्याच्या दर ठराविक किंमतीमध्ये राहिलेले दिसले आहे. शेवटच्या सत्रात सोन्याचे दर ०.२ टक्क्यांनी वाढले होते तर चांदीचे दरात ०.३ टक्क्यांची घसरण झाली होती.

जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर मागील आठवड्यातील सर्वात कमी किंमतीवर गेले आहे, याचे कारण म्हणजे अमेरिकेच्या प्रोत्साहन पॅकेजच्या अनिश्चिततेमुळे डॉलर मजबूत झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील सोन्याचे दर प्रति औंस ०.१ टक्क्यांनी घसरुण १८९९.४१डॉलर झाले आहे. तर चांदीच्या किंमतीत 0.5 टक्क्यांची घसरण होऊन प्रति औंस 24.45 डॉलर झाले आहे.  


भारताकडे सोन्याचा किती साठा आहे-
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या  अहवालानुसार भारतात सध्या ६५३ मेट्रिक टन सोने आहे. यामुळे सर्वाधिक गोल्ड रिझर्व्हच्या बाबतीत भारत जगात नवव्या क्रमांकावर आहे. 

दिवाळीनंतर सोन्याचे दर वाढू शकतात-
दिवाळीनंतर पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढू शकतात असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत सोन्याच्या किंमती आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठू शकते. दिवाळीनंतर सोने प्रति १० ग्रॅमला ५३ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments