६५ वर्षीय हरीश साळवे दुसऱ्यांदा चढणार लग्नाच्या बोहल्यावर, 'ही' असेल दुसरी पत्नीमाजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे  हे पुढच्या आठवड्यात लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत. हरीश साळवे हे देशातील नामांकित वकील आणि ब्रिटनमधील क्वीन्स कौन्सिल आहेत. 

६५ वर्षीय साळवे यांनी ३८ वर्षांचा विवाह मोडीत काढत गेल्या महिन्यात पत्नी मीनाक्षी साळवे यांना घटस्फोट देऊन ते वेगळे झाले. हरीश साळवे आणि मीनाक्षी यांना दोन मुलीही आहेत. हरीश साळवे २८ ऑक्टोबरला लंडनच्या चर्चमध्ये मैत्रीण कॅरोलिन ब्रॉसार्डशी लग्न करणार आहेत. या दोघांचं हे दुसरं लग्न आहे.

 एका कला प्रदर्शनात हरीश साळवे यांची कॅरोलिनशी भेट झाली. या दोघांमधील भेटी हळूहळू वाढल्या आणि नंतर घट्ट मैत्री झाली.

घटस्फोटानंतर साळवे हे मुलांपासून दूर लंडनमध्ये कॅरोलीन सोबत रहात आहेत. दोघांमधील समंजसपणाने त्यांचे संबंध पुढे गेल आणि आता सोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.


Post a Comment

0 Comments