बार्शी! कोरफळे येथे पंचेवीस हजाराचा अवैध दारूसाठा जप्त


बार्शी/प्रतिनिधी : तालुक्यातील कोरफळे येथे अवैध देशी दारूचा साठा पोलिसांनी धाड टाकून जप्त केला. सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक संदेश पवार, महेश माने, बाळकृष्ण मुठाळ, मुजावर या पोलीसपथकाने केली. कोरफळे येथे धाड टाकून सुमारे पंचेवीस हजार रुपयांची देशी दारू जप्त केली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, कोरफळे तालुका बार्शी येथे बेकायदेशीर विक्री करण्यासाठी देशी दारूचा अवैधरित्या साठा करण्यात आला असल्याची माहिती मिळालेवरून पोलीस नाईक संदेश पवार, महेश माने, बाळकृष्ण मुठाळ, मुजावर आदींनी शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोरफळे येथील शोभाताई नगर येथील सिमेंट रोडलगत असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये दारूचा साठा असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाले वरून छापा टाकला, असता तेथे बॉक्स आढळून आले.

त्यामध्ये टॅगो आणि ढोकी संत्रा कंपनीचे बॉक्स मिळून आले, ही एकूण पंचेविस हजार रुपयांची दारु जप्त करून पत्र्याचे शेड बाबतीत माहिती घेतली असता सदर शेड व दारू ही गावातील आण्णासाहेब विठ्ठल माने याचे असल्याचे सांगितले. याबाबत संदेश पवार यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

0 Comments