धार्मिक स्थळांसाठी मोर्चे काढण्यापेक्षा, प्लाझ्मा दान आवाहन करावं - अस्लम शेख


धार्मिक स्थळं उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने आज एका मोर्चाचं आयोजन केलं. यावरून मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आजच्या घडीला धार्मिक स्थळं उघडणं हा जनतेच्या जीविताच्या सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे का?, असा सवाल केलाय.

धार्मिक स्थळ उघडण्यासाठी मोर्चा काढण्यापेक्षा प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यासाठी जर विश्व हिंदू परिषदेचे लोक रस्त्यावर उतरले असते, तर ते जनतेच्या फायद्याचं ठरलं असतं, असं अस्लम शेख यांनी म्हटलंय.

यावरुन भाजपाचे नेते किती खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत आहेत, हे पाहायला मिळंत, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments