"माझं ऐका, पीडितांना भेटू द्या” योगीजी मी तुमच्यापेक्षा वरिष्ठ आहे.....योगीजी आपण स्वच्छ प्रतिमा असलेले शासक आहात. माध्यमांना राजकीय नेत्यांना हाथरस घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊ द्यावी, अशी विनंती भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी केली.

मी अस्वस्थ असून कोरोनाबाधित नसते तर सध्या पीडित परिवाराच्या गावात असते. एम्सच्या ऋषिकेश वार्डमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पीडित कुटुंबाला भेटणार असल्याचं उमा भारतींनी म्हटलंय.

मी भाजपमध्ये आपली मोठी बहीण आहे, माझ्या विनंतीला नकार देऊ नका, असंही उमा भारतींनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments